१) बँकेने बँकेचे सभासद व ग्राहकांसाठी एटीएम कार्ड, मोबाईल अॅप, युपीआय (फोन पे, पेटीएम, क्युआर कोड) इ. सुविधा सुरू केलेले असुन सदर सुविधांचा लाभ घ्यावा. ही विनंती.
२) आपल्या ठेवीचे मुदतीत म्हणजे मुदत संपल्यापासुन (१४ दिवसाच्या आत) नुतनीकरण करुन घ्यावे अन्यथा मुदत संपल्यानंतर सेव्हिंग खात्याप्रमाणे व्याज आकारले जाईल.
३) आयकर कायद्यातील खातेदारांचे एका बँकेतील सर्व मुदत व रिकरींग ठेवीमधील वार्षिक व्याज रक्कम रू. ४०,०००/- पेक्षा जास्त होत असेल तर त्यावर टि.डी.एस. (कर कपात) नियमाप्रमाणे करण्यात येईल. खातेदराने आपला पॅन नं. त्वरीत बँकेस कळवावा व फॉर्म नं. १५ जी / १५ एच सादर करून कर कपात टाळावे याची नोंद घ्यावी.
४) भारतीय रिझर्व बँकेच्या धोरणानुसार प्रत्येक खातेदाराने त्याच्या खात्यावर व्यवहार करावा अन्यथा १० वर्षे ज्या खात्यावर व्यवहार होणार नाही अशा खात्यातील सर्व प्रकारच्या ठेवींची रक्कम भारतीय रिझर्व बँकेला जमा करण्यात येते.
५) बँकेकडुन घेतलेल्या कर्जाचे व्याजाचे व हप्त्याचे वेळीच परतफेड करावी त्यासाठी परतफेडीच्या तारखा लक्षात ठेवाव्या म्हणजे त्यावरील २% दंड व्याज भरावे लागणार नाही. आपण जामिनदार असलेल्या कर्जदाराने कर्ज, कर्जाचे व्याज व हप्ते वेळेवर भरले किंवा नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे आपली अडचण होणार नाही.
६) खातेदारांना दिलेल्या चेकबुकचा वापर त्यांनी स्वतःच्या खात्यासाठीच करावा. दुसऱ्या व्यक्तीस स्वतःचे चेक / चेकबुक वापरासाठी देणे फौजदारी गुन्हा आहे.
७) खाते पुस्तक (पासबुक) स्टेटमेंट महिन्यातून कमीत कमी एक वेळा तरी बँकेतून भरून घ्यावे.
८) आपली ठेव आपल्याच बँकेत ठेवा इतर व्यवहारही या बँकेतच करा व आपले मित्र परिवार, आप्तेष्ट यांना देखील आपल्या बँकेत व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहीत करा.
९) ज्या सभासदांनी अद्याप वारसांची नोंद केली नसेल त्यांनी ती त्वरीत करून घ्यावी. वारसनोंद अर्ज बँकेच्या शाखामध्ये उपलब्य आहे.
१०) बँकेने सभासद व खातेदार यांच्यासाठी आर.टी.जी.एस. (RTGS), एनइएफटी (NEFT), SMS सुविधा, सी.टी.एस. चेक क्लिअरींग
११ )सुविधा, पर्सनलाईज चेकबुक, मोबाईल बँकिग सुविधा उपलब्ध केलेले आहे . सदर सुविधांचा सभासद व खातेदारांनी लाभ घ्यावा. ज्या सभासदाकडे आपल्या व्यवसायाचा GST नंबर असेल त्यांनी आपला GST नंबर बँकेस कळवावा.
१२) सभासदांनी के.वाय.सी. नॉर्मची पूर्तता केलेली नसेल त्यांनी आपला अद्यावत फोटो, फोटो आयडी (पॅनकार्ड व आधारकार्ड) ची झेरॉक्स प्रत बँकेस जमा करावी.
