आपली बॅंक

बँकेचे ठळक वैशिष्ट्ये

१) संपुर्ण कोअरबँकिंग
२) आरटीजीएस, एनईएफटी
३) सीटीएस (मायकर) क्लिअरींग चेक
४) एसएमएस सुविधा
५) लाईटबिल, टेलीफोन बील भरणा केंद्र
६) नियमित कर्जखात्यांना रिबीट
७) ठेवीवर ५ लाखापर्यंत विमा संरक्षण
८) मोबाईल बँकिग सुविधा उपलब्ध
९) सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठा
१०) लॉकर सुविधा
११) तत्पर व नम्र सेवा

 

  • बँकेची स्थापना – दिनांक ०६/०५/१९५९

  • बँकेचे संस्थापक व प्रथम चेअरमन – कै. अँड पी. बी. कासलीवाल

  • भागभांडवल – रुपये २५,०००/-

  • ठेवी – रुपये २७,०००/-

  • कर्जवाटप – रुपये २१,०००/-

  • रिझर्व्ह बँकेकडुन दिनांक २८/०१/१९८७ लायसन्स प्राप्त झाले.

  • नोट बंदी काळात अनेक शेतकरी वर्गाचे खाते उघडुन तसेच व्यापारी वर्गास हवे तेवढी चेकबुकची सुविधा उपलब्ध करुन दिली त्याचबरोबर त्वरीत सदर चेकची रक्‍कम शेतकरी वर्गास पैसे वर्ग करुन रोख रक्‍कम अदा करण्यात आली.

  • त्याचा परिणाम दि.३१/०३/२०१७ अखेर बँकेच्या ठेवीं रु. ५५ कोटी ५५ लाख व दिनांक ३१/०३/२०२० अखेर रु १०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला.

  • नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन तर्फे उत्कृष्ट कामकाजाबद्दल सन-२०१८ मध्ये रु. ५० ते रु. १०० कोटीच्या गटात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.

  • दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि. मुंबई यांच्याकडुन रु. ५० कोटी ते रु. १०० कोटी बँक गटात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार सन २०१८ मध्ये प्राप्त झाला.

  • बँकेने सर्व सोयीयुक्त प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करुन त्यात कामकाजाची सुरवात केलेली आहे.

  • खातेदारांसाठी मायकर चेक क्लिअरींग, सीटीएस चेक, पर्सनल चेकबुक सुविधा, एसएमएस सुविधा, लाईटबिल, टेलीफोनबिल भरणा, यासारख्या अनेक सुविधा सुरु केलेल्या आहे.

  • बँकेचे कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा यास सहकार खात्याची मंजुरी मिळालेली आहे.

  • बँकेने याच वर्षामध्ये मोबाईल बँकींग सुविधा सुरु केलेली आहे.

  • मा. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने आपल्या बॅंकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधा सुद्धा सुरू झालेल्या आहेत.

  • बँकेच्या उमराणा शाखेपरवानगी मिळालेली असुन नियमीत कामकाज देखील सुरू झालेले आहे.

Logo and QR of Deposit Insurance And Credit Guarantee Corporation (DICGC)

 

Top